लेख
24-Nov-2025
...


(शहीदी दिवस 25 नवंबर 2025, मंगलवार वर विशेष) श्री गुरु तेग बहादरजी सिख पंथाचे नौवे गुरु आहे. त्यांचे व्यक्तित्व महान, विलक्षण आणि प्रभावशाली होते. त्यांचे प्रेमळ व आकर्षक व्यक्तित्वानी त्यांचा शिष्यां शिवाय अनेक धर्मातील लोकपण प्रभावित झाले होते व आपला गुरु मानून सच्चा पातशाह म्हणून संबोधित करत होते. गुरु तेग बहादरजी सौंदर्याची मूर्ती होते. त्यांचा चेहरा अलौकिक तेजानी उजळून प्रकाशित होता. ते महान योद्धा आणि तेजस्वी होते. त्यांनी बालपणातच शस्त्रविद्या प्रसिद्ध आचार्य योद्धा ‘मल्ल’ याच्या कडून प्राप्त केली. त्यांचे वडील सहावे गुरु श्री हरगोंविद साहिब आपल्या काळात वीर योद्धा होते, त्यांच्या विरतेचा प्रभाव गुरुजी वर पडला. गुरुजींच्या वीरतेचे प्रदर्शन आम्हाला करतापुर च्या युद्धात पहायला मिळते. युद्धात विरुद्ध पंथाचा जोर पाहुन श्री तेग बहादर आणि त्यांचे भाऊ सुरजमल यांनी एका बाजुला समोर होऊन वैÚयांवर बाणांचा वर्षाव करुन अनेक वैÚयांना घायळ करुण मारूण टाकले. नंतर दुश्मनांचा प्रभाव पाहुन दोघांनी कृपाण ने त्यांना घायळ केले व काहींना मृत्यू लोकांत पोहचवले. या दोघांची हिंमत पाहून त्यांचे सैनिकांचा ही उत्साह आणि मनोबल वाढले आणि याप्रमाणे त्यांनी युद्धात पूर्ण वीरताचे प्रदर्शन केले आणि शेवटी त्यांचे वडील श्री गुरु हरगोविंद साहिब यांना विजयश्री प्राप्त झाली. त्यांनी धर्म व सत्य व्यवहार चा प्रचार केला व अनेक कठिण परिस्थितीचा सामना साहसतेनी व दृढतापूर्वक केला व जीवनात सदैव क्रियाशील आणि सफल राहिले. गुरुजीमधे सहनशीलता, त्याग, क्षमा हे गुण विद्यमान होते. कितीदा विरोधी लोकांनी इर्षेनी गुरुजींना मारण्याचा ही प्रयत्न केला पण ते या दुष्कर्मात असफल राहिले. एकदा गुरु हरगोबिंद साहिबांचा नातू धीरमल गुरुगद्दी प्राप्त करायला आपला मित्र ‘शीहे’ च्या मार्फत गुरु तेग बहादर यांच्यावर गोळी चालवली ती गुरूजींच्या डोक्याचा वरुन स्पर्श करून समोर गेली. ती गोळी ‘शीहे’ नी आपल्या मित्रासाठी चालवली आणि गुरूजी त्यातून वाचले. यावर गुरूजींनी काही राग प्रगट केला नाही व क्षमाचा सागर गुरूजी हसून म्हणाले धीरमल तूझे भले होईल. इतकेच नाही दूसÚयांदा शीहा आपली 50 माणसे घेऊन गुरूजींचे संपूर्ण धन-दौलत चोरून धीरमल जवळ घेऊन आले. धीरमल शीहेच्या या कृत्यावर प्रसन्न झाला. पण जेव्हा या घटनेची चाहूल गुरूजींचे परमसेवक भाई मक्खणशाह ला लागली तेव्हा तो क्रोधित झाला व 500 मित्रलोक घेऊन धीरमलच्या घरावर गेला व ‘शीहे’ ला साखळी नी बांधून तिथे पडलेले सर्व धन व सामान वाापस गुरूजी जवळ घेऊन आला. शीहे ला त्याच दशेत गुरूजी समोर आणून उभे करुण म्हणाला आपण आज्ञा कराल तर याला गोळी मारण्याची शिक्षा दिली जाईल. यावर दयावान गुरूजी म्हणाले. मक्खणशाह, लक्ष्मी लोभ व झगडयाची जड आहे. हिला धीरमललाच देऊन द्या आणि शीहे ला साखळीतून सोडून द्या. ते त्यांची केलेली करणी स्वतः भोगेल. गुरूजींचा हुकूम ऐकून मक्खणशाह नी शीहें ला सोडून दिले व सर्व धन-सामान धीरमलाच्या घरी वापस पोहचवून दिले. याप्रमाणे गुरूजींना कोणत्याही प्रकारची लालच नव्हती व ते क्षमावान, दयालू आणि सात्विक प्रकृति चे होते. त्यांनी आपल्या जीवनात वैराग्यमयी वाणी द्वारा जगाला अनेक उपदेश दिले ज्यात मुख्यतः हे आहेत. ‘‘साधो मन का मानु तिआगउ’’ गुरूजींनी अहंकाराला मनाच्या विशेष विकार सांगितला आहे. कारण ते अन्य सर्व विकारांना उत्पन्न करायला तथा विकसित करायला मदत करतेे म्हणून त्यांचा त्याग करणे आवश्यक आहे. गुरुजींचे अन्य उपदेष- ‘‘रे मन राम सिउ करि प्रीति।। सरवन गोविंद गुन सुनहु अरू गावहू रसना गीत।।’’ गुरूजी उपदेश देताना म्हणतात. हे मना तू रामा शी प्रेमकर पण ते प्रेम तेव्हा पर्यत पूर्ण आहे जेव्हा जेव्हा जीव कानानी गोविंदाचे गुणगान ऐकेल व रस घेऊन परमात्याचे भजन म्हणेल. गुरूजी म्हणतात की- ‘‘ गुन गोविंद गाइओ नही जनमु अकारथ कीन’’।। परमेश्वराचे गुण आणि स्तुति केल्या शिवाय या जीवाचे जीवन निरर्थक आहे. आणि प्रत्येक जीवानी परमेश्वराची स्तुति आणि गुणगान केले पाहिजे- ‘‘ करणो हुतो सुना कीओ परिओ लोभ के फंध।। नानक समिओ राम गइयो अब किउ रोवत अंध।।’’ सांसारिक लोभ, माया मधे फसून ज्या माणसानी सेवा, परोपकार, सिमरन, गायन इत्यादी शुभ कर्म केले नाही त्यांचे अनमोल जीवन व्यर्थ ही जाईल व त्यांना शेवटी रडावे लागेल. प्रत्येकाला माया च्या व्यवहारा सोबत सेवा-परोपकार शुभ कर्म व प्रभु सिमरन गायन करणे अतिआवश्यक आहे. या प्रमाणे उपदेशाचे 118 शब्द व सलोक गुरूजींनी उच्चारण केलेले आहे. जो श्री गुरू ग्रंथ साहिब मधे शामिल आहे. अशा महान उपदेशक, दयालू, निरवैर, क्षमाचे सागर गुरूजींचा शहीदी दिवस 19 डिसेंबर 1675 ईसवी साका मघर सुदी 5 संवत 1732 ज्याची या वर्ष समकक्ष इंग्रजी तारीख मंगलवार, 25 नवंबर 2025 ला आहे त्यांच्या शहीदी दिवसावर शतः शतः प्रणाम। ईएमएस/24/11/2025